Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

महिलांच्या सन्मानासाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे राज्यभर शाखा

महिलांच्या सन्मानासाठी दुर्गा ब्रिगेडचा राज्यभर Shot विस्ताराचा निर्णय

marathinews24.com

पुणे – राज्यात महिलांविरोधातील वाढते अत्याचार, असुरक्षितता आणि बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे राज्यभर शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्षा दुर्गा भोर आणि मुख्य सरचिटणीस अभय भोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात नववीच्या विद्यार्थीनीकडून ४२ वर्षीय शिक्षकेला प्रपोज – सविस्तर बातमी

महिलांच्या सन्मान, संरक्षण आणि स्वावलंबनासाठी हा लढा आता अधिक व्यापक आणि संघटित स्वरूपात राबवण्यात येणार आहे. दुर्गा ब्रिगेड संघटना राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका व शहरी भागात महिला केंद्रित शाखा स्थापन करणार असून, महिलांच्या प्रश्नांवर थेट हस्तक्षेप, कायदेशीर मदत आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याचे कार्य केले जाणार आहे. महिलांविरोधातील अन्याय, छळ आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलेसोबत संघटना ठामपणे उभी राहील. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलत दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे राज्यातील विविध ठिकाणी मुली स्वतःची रक्षा स्वतः करता यावी, यासाठी शारीरिक, मानसिक आणि कायदेशीर व महिलांसाठी स्वसैरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

बेरोजगार, कष्टकरी, विधवा व एकल महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. “महिलेला दया नव्हे, रोज़गार हवा” ही दुर्गा ब्रिगेडर्ची ठाम भूमिका असल्याचे दुर्गा भोर यांनी यावेळी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×