सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यंनी एका ज्येष्ठ महिलेची ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार करू खून – सविस्तर बातमी
तकारदार ७६ वर्षीय ज्येष्ठ महिला शनिवार पेठेत राहायला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर १९ सप्टेंबर रोजी संपर्क साधला. ‘तुमच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाला आहे. याप्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार आहे’, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. गेल्या दोन महिन्यात महिलेने वेळोवेळी ७४ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.
सक्त वसुली संचालनालय (ईडी),अमली पदार्थ विरोधी पथक (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) अशा यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील अनेकांची फसवणूक केली आहे.




















