Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग

ढोल पथकातील वादकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जन सोहळ्यात वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अश्लिल वर्तन करुन तिच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी ढोल ताशा पथकातील वादकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेलबाग चौकात ही घटना घडली.याबाबत एका महिला पत्रकाराने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी त्रिताल या ढोल ताशा पथकातील दोन वादकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात गणपती विसर्जन सोहळ्यात दागिने, मोबाइल चोरीला – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला पत्रकार विसर्जन सोहळ्यात शनिवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वार्ताकरन करत होती. त्या वेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील एका वादकाने लोखंडी ट्राॅली ओढत आणली. पायावरुन चाक गेल्याने महिला पत्रकाराने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा वादकाने महिला पत्रकाराशी वाद घालून धक्काबुक्की केली. तिच्याबरोबर अश्लिल वर्तन केले. महिला पत्रकाराबरोबर असलेल्या सहकाऱ्याने वादकाला जाब विचारला. तेव्हा वादक आणि त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याने त्याला धक्काबुक्की केली.

मारहाणीत त्याचा चष्मा तुटला असून, ढोल पथकातील वादकांनी दोघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या प्रकरणी ढोल ताशा पथकातील दोन वादकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत. तसेच याबाबत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सोमवारी निवेदन दिले. पत्रकार संघाकडून कारवाईची मागणी करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×