पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक

ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणीला ५ लाख ९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना १६ ते १७ सप्टेंबरला हडपसरमधील विठ्ठलनगरात घडली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरूणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व टेलीग्राम आयडीधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सायबर चोरट्यांचा जेष्ठाला २० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी हडपसरमधील विठ्ठलनगरात राहायला आहे. १६ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी तिला टेलीग्रामवरून मेसेज केला. पार्टटाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादित केला. तरूणीला परतावा देण्याचेही आमिष दाखवून पैसे पाठविण्यास भाग पाडले. अवघ्या दोन दिवसांत सायबर चोरट्यांनी तरूणीला ५ लाख ९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×