शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

नेपाळमधील चोरट्यांसह ५ जण अटकेत

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतणुकीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये नेपाळमधील दोन चोरट्यांचा समावेश आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यातील रोकड वळविण्यात आल्यानंतर ती आरोपीच्या खात्यात जमा व्हायची. आरोपींकडून १० मोबाइल, पेन ड्राईव्ह, चार लॅपटाॅप, त्रेपन्न बँकांचे डेबिट कार्ड, १७४ सीमकार्ड, २७ क्यूआर कोड, विविध कंपन्यांचे शिक्के, धनादेश पुस्तिका असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पंढरीला निघालेल्या कुटुंबीयाला कोयत्याच्या धाकाने लुटले;अल्पवयीन मुलीवर अत्याचार – सविस्तर बातमी

अनिकेत प्रशांत भाडळे (वय २७, रा. शिवाजीनगर, गावठाण), नोरबू शेर्पा (वय २८), अंग नुरी शेर्पा (वय २१, दाेघे रा. नेपाळ), सागर मच्छिंद्र गायकवाड (वय २६, रा. गणेशमळा, सिंहगड रस्ता), शिवतेज अशोकराव गुंजकर (वय ३३, रा. जांभुळवाडी, आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. फसणुकीतील १४ लाख ३० हजारांची रकम आदियोग स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंट एलएलपी या खात्यात वळविण्यात आली होती.

हे खाते भाडळेचे असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी भाडळेला ताब्यात घेतले. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शेर्पा, गायकवाड, गुंजकर यांची नावे निष्पन्न झाली. पाेलिसांच्या पथकाने नऱ्हे भागातील एका हाॅटेलमधून शेर्पा यांना अटक केली.

आरोपी भाडळेने बनावट कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या नावे एका बँकेत खाते उघडले होते. या खात्याचा वापर सायबर चोरट्यांना करण्यास दिला होता. फसवणूक प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, सहायक फौजदार संदेश कर्णे, पोलीस कर्मचारी प्रवीणसिंह रजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, जान्हवी भडेकर, प्रशांत बोऱ्हाडे, बाळासाहेब चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top