Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

आषाढी वारीत आरोग्य पथकाची तत्परता; वेळीच ‘सीपीआर, देत वारकऱ्याचे प्राण वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न

आषाढी वारीत आरोग्य पथकाची तत्परता; वेळीच 'सीपीआर, देत वारकऱ्याचे प्राण वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न

आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण

marathinews24.com

पुणे – आषाढी वारीदरम्यान एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे संबंधित वारकऱ्याला तातडीने जीवनरक्षक उपचार मिळाले.

आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश – सविस्तर बातमी 

कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे तसेच त्यांच्या समर्पित आरोग्य पथकाने प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर (Cardio Pulmonary Resuscitation) देऊन प्राथमिक जीवनरक्षक उपचार सुरू केले. त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी त्वरित वैद्यकीय संस्थेत हलविण्यात आले.

आरोग्य यंत्रणेची सज्जता, कौशल्य आणि सेवाभाव यामुळे आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी उपचार मिळाल्याने वारकऱ्याच्या जीव वाचण्यास मदत झाली. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या आरोग्य पथकांच्या दक्षतेचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

या जीवनरक्षक कार्याबद्दल कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे तसेच संपूर्ण आरोग्य पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या तत्पर, संवेदनशील आणि समर्पित सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×