Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करा-मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर

सचिवांकडून जिल्ह्यात सुरु असलेल्या मृद व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष पाहणी

marathinews24.com

पुणे – ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविण्याच्यादृष्टीने मृद व जलसंधारण उपचारांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; जिल्ह्यातील भूजल पातळी वाढीकरिता महत्त्वपूर्ण असलेली ही कामे दर्जेदार पद्धतीने आणि गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांनी दिले.

बारामती एमआयडीसी परिसरात उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

सचिव पापळकर यांनी पुणे जिल्ह्यातील वाघापूर, गुरोळी, साकुर्डे आदी गावात सुरु असलेल्या पाझर तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, आदी कामांची पाहणी केली. यावेळी जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता नितीन दुसाने, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, कार्यकारी अभियंता दिपक लांडगे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव बोरकर आदी उपस्थित होते.

यावेळी पापळकर म्हणाले, जलसंधारण ही काळाची गरज असून, पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करण्यासाठी मृद व जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे करावीत. लोकसहभागाद्वारे गाळ काढण्याच्या व नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना श्री. पापळकर यांनी आवाहन केले, उपलब्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पावसाळ्यातील पाण्याचा साठा करुन त्याचे सूक्ष्म नियोजन करुन वापर करावा.

आढावा बैठकीत जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या सूचना

पापळकर यांनी मृद व जलसंधारण योजनांच्या अंमलबजावणीबाबत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि भविष्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजना तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मृद व जलसंधारणाची कामे हाती घेण्याबरोबरच नवीन कामांचे प्रस्ताव सादर करावेत. अतिशोषित, टॅंकरग्रस्त गावांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठीची कामे कमी कालावधीमध्ये पूर्ण करावीत, अशा सूचना श्री. पापळकर यांनी दिल्या.

यावेळी विभागाचे उप अभियंता सागर भोर, सुयश महाडीक , ओमकार शेरकर आणि सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×