कॅबिनेट मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न
marathinews24.com
पनवेल – आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने “स्वच्छता अभियान” राबविण्यात आले. कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि ५०० खाजगी आयटीआय मधून हजारो विद्यार्थी व शिक्षकांनी ७५० गावांमध्ये सदर स्वच्छता अभियान राबवले. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
विकसित मराठवाड्यासाठी गावाशी नाळ जोडलेली ठेवा- व्यंकटराव गायकवाड – सविस्तर बातमी
आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवले गेले. त्यांच्या सूचनेनुसार गावागावांत रस्त्यांपासून शाळांच्या परिसरापर्यंत, बाजारपेठांपासून सार्वजनिक स्थळांपर्यंत युवकांनी झाडू हाती घेत स्वच्छता सेवा केली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सुद्धा या कार्यात उत्साहाने सहभाग घेतला.
याबाबत बोलताना कॅबिनेट मंत्री लोढा म्हणाले “आदरणीय पंतप्रधानांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील युवकांनी स्वच्छ भारताच्या संकल्पनेसाठी घेतलेला पुढाकार अभिमानास्पद आहे. आदरणीय पंतप्रधान नेहमी सांगतात की स्वच्छता केवळ एका दिवसासाठी नाही तर ती आपल्या दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असावी. मला विश्वास आहे की आज स्वच्छता अभियानात सहभागी झालेली तरुण पिढी स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य देईल आणि स्वच्छ भारतासाठी नेहमीच प्रयत्न करेल. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश आम्ही जनमानसात रुजवला. आदरणीय पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त केलेली स्वच्छता सेवा अभूतपूर्व ठरेल.





















