खडक पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – नवीन घरात तिजोरी नेत असताना कामगारानेच डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित प्रकरणात चोरट्याने तब्बल १ कोटी ६० लाखांची सोन्याची बिस्कीटे चोरून नेली होती. त्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १९ जानेवारीला शुक्रवार पेठेत घडली होती. नेताजी अरूण जाधव (वय ३३ रा. निगडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी गौतम सोळंकी (वय ५२, रा. शुक्रवार पेठ, पुणे ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यात डाव मोडला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सोळंकी हे शुक्रवार पेठेत राहायला होते. त्यांनी टिळक रस्त्यावर नवीन घर घेतल्यानंतर जुन्या घरातील तिजोरी त्याठिकाणी न्यायची होती. त्यावेळेस त्यांनी मजूराला कामाला लावले होते. त्याने तिजोरीतील १ कोटी ६० लाखांची सोन्याची बिस्कीटे काढून घेत चोरी केली. त्यानंतर याप्रकरणी काही दिवसांनी सोळंकी यांना तिजोरीतील सोन्याच्या बिस्कीटांची संख्या कमी असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.