Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

कोंढव्यातील कथित बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या मित्राला नोटीस

कोंढव्यातील कथित बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या मित्राला नोटीस

कोंढवा बलात्कार प्रकरण

marathinews24.com

पुणे – कोंढव्यातील कथित बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या मित्राला नोटीस – कोढव्यातील कथित बलात्कार प्रकरणात पोलिसांना खाेटी फिर्याद देऊन दिशाभूल करणाऱ्या संगणक अभियंता तरुणीच्या मित्राला पोलिसांनी नोटीस बजाविली आहे. याप्रकरणात मित्राला अटक करण्यात येणार नाही. पोलिसांना तपासात सहकार्य करावे, तसेच तपासकामी बाेलाविण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

पैशांसाठी बालिकेची केली साडेतीन लाखांत विक्री – सविस्तर बातमी 

कोंढव्यातील बलात्कार प्रकरणात तरुणीने दिलेल्या तक्रारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित तरुणीचा मित्र असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी (२ जुलै) एका संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे आली. ‘एक तरुण कुरिअर कंपनीतील कर्मचारी असल्याची बतावणी करून घरात शिरला. त्याने तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध करून बलात्कार केला,’ अशी फिर्याद कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणीने दिली होती. त्यानंतर तरुणीने दिलेल्या वर्णनावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे ५०० पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते. तपासात तरुणीने पोलिसांना खोटी तक्रार देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तिच्या घरात शिरलेला संशयित तरुण हा कुरिअर कंपनीतील कामगार नसल्याचे उघडकीस आले होते. तपासात तो तरुणीचा मित्र असल्याचे उघडकीस आले होते.

तरुणीच्या मित्राला पोलिसांनी चौकशीला ताब्यात घेतले होते. याप्रकरणात त्याला अटक करण्यात येणार नाही. तपासासाठी बोलाविल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, अशी नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×