Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांचा स्मृतिदिन उपक्रमांनी साजरा

शैक्षणिक सुविधा उपक्रमाचे भूमिपूजन

marathinews24.com

पुणे – पद्मविभूषण मा. डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजोपयोगी कार्याची परंपरा पुढे चालवत एक अर्थपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक सुविधा उपक्रमांतर्गत टॉयलेट ब्लॉक बांधकामाच्या भूमिपूजनाचा समारंभ ‘केईएस सी. के. गोयल आणि टिकराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालय, खडकीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये ५० विशिष्ट व्यक्तिमत्वांचा गौरव – सविस्तर बातमी

उपक्रमाची अंमलबजावणी ‘देसाई ब्रदर्स लिमिटेड (डीबीएल), पुणे’ आणि ‘वनराई’ संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत असून, शैक्षणिक परिसरात मूलभूत सुविधांची उभारणी करून विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ‘देसाई ब्रदर्स लिमिटेड’चे सीएसआर प्रमुख चंद्रकांत रावल, ‘न्यू इंग्लिश स्कूल, माळथन’चे प्राचार्य संजय चकाणे उपस्थित होते. त्याचबरोबर ‘केईएस’ संस्थेचे पदाधिकारी, ‘वनराई’ संस्थेचे सदस्य, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

उपक्रमाचा उद्देश शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी, स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करणे हा आहे. ग्रामीण भागात योग्य स्वच्छतागृहांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षणात अडथळ्यांचा सामना करावा लागतो. ‘वनराई’ संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अशा समस्यांवर उपाय म्हणून ग्रामीण शाळांमध्ये स्वच्छतागृहे आणि पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. या प्रयत्नांमुळे अनेक शाळांमधील विद्यार्थिनींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम विशेष अर्थपूर्ण ठरला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. या निमित्ताने रेडिओ टीजे ८९.५ एफएम वाहिनीवर अमित वाडेकर यांनी डॉ. मोहन धारिया यांच्या जीवन कार्याविषयी आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या अमूल्य योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली. उपक्रम शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी या तिन्ही घटकांना एकत्र आणणारा ठरत असून, ग्रामीण आणि शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×