Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये ५० विशिष्ट व्यक्तिमत्वांचा गौरव

उद्योग, शिक्षण, कला, वैद्यक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा सन्मान

marathinews24.com

पुणे – लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ D2 तर्फे आयोजित “लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्स सोहळा २०२५” हा भव्य कार्यक्रम आज पुण्यातील प्रतिष्ठित हॉटेल शेराटन येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० विशिष्ट व्यक्तिमत्वांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

मनसेचे अमित ठाकरे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट – सविस्तर बातमी

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री संगीता बिजलानी होत्या. त्यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांसह पुरस्कार प्रदान केले. विशिष्ट अतिथी म्हणून श्री फत्तेचंद रांका (अध्यक्ष – पुणे व्यापारी महासंघ), श्री कृष्णकुमार गोयल (चेअरमन – कोहिनूर ग्रुप), श्री मनीष भारद्वाज (डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय) आणि श्री विनोद वर्मा (लायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल) हे उपस्थित होते.

सन्मानित व्यक्तींमध्ये उद्योग, व्यापार, वैद्यक, शिक्षण, कला, क्रीडा, विज्ञान, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सेवा या विविध क्षेत्रांतील अग्रगण्य व्यक्तिमत्वांचा समावेश होता. प्रमुख सन्मानितांमध्ये अनिल बांगडिया, डॉ. अभिजीत सोनवणे, लायन सलीम शिकलगर, ऋतुजा जाधव, डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. रश्मी, डॉ. सिद्धार्थ टंडन, तसेच नितिन अग्रवाल, सोनू अग्रवाल, आशा ओसवाल, रवींद्र गोलार, डॉ. महेश थोरवे (MIT Group of Institutions), संजय जालान, रवी अग्रवाल, रुजुता जगताप, तनय अग्रवाल आणि ब्युटी क्वीन व मॉडेल ईशा अग्रवाल यांचा समावेश होता.
या सर्वांना त्यांच्या उत्कृष्ट कार्य आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरविण्यात आले.

सेवा आणि सन्मानाचा संगम

या प्रसंगी लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल म्हणाले की,

“हा सोहळा केवळ सन्मानाचे व्यासपीठ नाही, तर समाजोपयोगी उपक्रमांसाठी सहकार्य उभे करण्याचे माध्यम आहे.” त्यांनी पुढे सांगितले की लायन्स इंटरनॅशनल लवकरच दोन नवे सामाजिक उपक्रम सुरू करणार आहे.

‘धर्मपुत्र अभियान’ – एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी लायन्स सदस्यांना वैयक्तिक जबाबदारी देण्यात येईल, जेणेकरून त्यांना एकटेपणा जाणवू नये.

‘नवा सवेरा’ – अंधत्व निर्मूलन व नेत्रदान प्रोत्साहनासाठी विशेष अभियान, ज्याअंतर्गत पुढील ८–१० वर्षांत प्रांतातील प्रत्येक नेत्रहीन व्यक्तीस दृष्टीदान मिळवून देण्याचा संकल्प आहे.

भव्य सूत्रसंचालन

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय कुलकर्णी आणि आर्किटेक्ट स्नेहल मांडवकर यांनी अत्यंत प्रभावी आणि उत्साही पद्धतीने केले. त्यांच्या सुसंवादी सूत्रसंचालनामुळे संपूर्ण सोहळ्याला जिवंतपणा आणि गौरव प्राप्त झाला.

लायन्स इंटरनॅशनल : सेवेची शताब्दी परंपरा

गेल्या १०८ वर्षांपासून लायन्स इंटरनॅशनल ही संस्था जगातील २०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून, दरवर्षी सुमारे ३० कोटी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे. प्रांत ३२३४ D2 (पुणे, अहमदनगर, नाशिक) तर्फे डायबिटीज नियंत्रण, कर्करोग जागरूकता, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, मानसिक आरोग्य आणि सांस्कृतिक विकास या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले जात आहे.

हा सोहळा सेवा, सन्मान आणि सामाजिक जबाबदारीचा अद्वितीय संगम ठरला – जिथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सन्मानितांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प पुनः दृढ केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×