Breking News
सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्नशेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्यसायबर चोरट्यांकडून महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूककेरळ सहलीच्या आमिषाने पर्यटकांची फसवणूकबी.एससी – एचएचए अभ्यासक्रमाकरीता ३१ मेअखेर अर्ज करण्याचे आवाहनशिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जयतु शंभू’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनमुलांच्या भांडणावरून सुरू झालेला वाद फ्री स्टाईल हाणामारीवर पोहोचलापुण्यात मुसळधार पावसामुळे ५ ठिकाणी झाडे काेसळलीकंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने साडेतीन कोटीचा गंडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार पिंक ई – रिक्षांचे वितरण

पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना “पिंक ई- रिक्षा ” वाटपाचे उद्दिष्ट

Marathinews24.com

पुणे – महिला व बाल विकास विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना “पिंक ई- रिक्षा ” वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्हयात २० ते ५० वयोगटातील ३ हजार २३० इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी समितीने 1 हजार ७२६ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ६० लाभार्थी महिलांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ६० कायनेटिक ग्रिन कंपनीचे “पिंक ई- रिक्षा” वितरीत केली जाणार आहे. सोमवारी २१ एप्रिलला दुपारी एक वाजता कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर मैदानावर कार्यक्रम पार पडणार आहे.

हिंदुत्ववादी संघटनाची चळवळ मोडीत काढण्याचा डाव; भाजप प्रवक्ते माधव भंडारी – सविस्तर बातमी

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, विभाग सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित राहणार आहे.

महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ८ जिल्हयातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास प्राधान्य दिले आहे. महिला व मुली यांना सुरक्षित प्रवासासाठी इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी “पिंक ई- रिक्षा ” योजना सुरू करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top