कविता माणसाला जगण्याचे बळ देते – राजन लाखे

कविता माणसाला जगण्याचे बळ देते - राजन लाखे

पुणे बुक फेअरचा समारोप

marathinews24.com

पुणे – कविता माणसाला जगण्याचे बळ देते. सामाजिक जाणिवेच्या व वेदनांवर फुंकर घालणाऱ्या कविता सादर करून कवींनी आपल्यातील प्रतिभा सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.

बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक व युवती-महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन – सविस्तर बातमी 

एक्सपो सेंटर, महाराष्ट्र साहित्य परिषद, आकाशवाणी, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आपटे रोडवरील सेंट्रल पार्क येथे 23व्या पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा येथे कविसेंमलन रंगले. पुणे बुक फेअरचे आयोजक पी. एन. आर. राजन, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस उपस्थित होते. कवि संमेलनाने पुणे बुक फेअरचा समारोप झाला.

कवि संमेलनामध्ये अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर, जोत्स्ना चांदगुडे, वि. दा. पिंगळे, माधव राजगुरू, सविता कुरुंदवाडे, रुद्रांश जगताप, डॉ क्षितिजा पंडित, रूपाली अवचरे, प्रशांत निकम, डॉ प्रेरणा उबाळे, शरयू पवार, डॉ. राहुल भोसले, विनोद अष्टूळ, रमेश जाधव, दशरथ दूनधव, डॉ मृणालिनी गायकवाड, डॉ. लता पाडेकर, डॉ. गोविंद सिंग राजपूत, ज्योत्स्ना बिडवे, आकांक्षा अग्रवाल आदी मान्यवर कवी सहभागी झाले होते. कवींनी सादर केलेल्या कवितांवर मार्मिक भाष्य करत राजन लाखे यांनी कार्यक्रम रंगवत नेला. आभारप्रदर्शन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. सुनील धनगर यांनी केले. कविसंमेलनास उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×