Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुण्यात गणपती विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस सज्ज- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

मानाच्या मंडळाना पोलिसांचे वेळापत्रक; मानाची मंडळे लवकर मार्गस्थ होण्यासाठी नियोजन

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाची ‘वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहरात विसर्जन सोहळ्यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. मानाच्या मंडळांसाठी वेळापत्रक देण्यात आले असून, संबंधित मंडळांनी त्यास सहमती दिली आहे. विसर्जन मिरवणूक सोहळा लवकर पार पाडण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ सकाळी साडेदहा वाजता सुरू होतो. यंदा मानाच्या मंडळाची विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास आधी म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे’, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करा – अधीक्षक अभियंता – सविस्तर बातमी

विसर्जन मिरवणूक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. विसर्जन मिरवणूक सोहळा शिस्तबद्धपणे, तसेच वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसंनी नियोजन केले आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ, अखिल मंडई मंडळाने लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर विसर्जन मिरवणुकीबाबतील सहभागावरुन पेच निर्माण झाला होता. विसर्जन मिरवणुकीतील क्रम, तसेच सहभागावरुन निर्माण झालेला तिढा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुढाकार घेऊन सोडविला.

त्यानंतर मानाच्या मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची बैठक झाली. विसर्जन मिरवणूण वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मनाच्या मंडळांना वेळापत्रक ठरवून दिले. मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळाने पोलिसांच्या नियोजन आणि वेळापत्रक पाळण्याची हमी दिली. मिरवणूक सोहळ्याच्या नियोजनाबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली .सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, निखील पिंगळे यावेळी उपस्थित होते.

पोलिसांचे वेळापत्रक वाचा

‘विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ शनिवारी (६ सप्टेंबर) होणार आहे. सकाळी सव्वानऊ वाजता मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे मंडईतील टिळक पुतळा, येथे आगमन होईल. सकाळी साडेनऊच्या सुमारास पूजा झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ होईल. कसबा गणपती मंडळ सकाळी सव्वासहाच्या सुमारास बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होईल. त्यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ सकाळी साडेदहा वाजता बेलबाग चौकातून मार्गस्थ होईल. मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपती मंडळाचे कार्यकर्ते गुलाल उधळून मिरवणुकीचा प्रारंभ करतात. पूजा आणि आरती झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास गुरूजी तालीम मंडळ मार्गस्थ होईल. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळ आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी बारापर्यंत बेलबाग चौकातून मार्गस्थ होईल.अशा प्रकारे सर्व मानाचे पाचही गणपती दुपारी बारापर्यंत लक्ष्मी रस्त्यावरुन मार्गस्थ होतील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

दुपारी एकपर्यंत महापालिकेचे गणपती मंडळ आणि त्वष्टा कासार गणपती मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील. दुपारी चारच्या सुमारास श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ बेलबाग चौकातून मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेणू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळ मुखअय मिरवणुकीत सहभागी होतील. मानाची मंडळे सायंकाळी सातपर्यंत बेलबाग चौकातून मार्गस्थ होतील, असे त्यांनी सांगितले.

विद्युत रोषणाईची मंडळे सायंकाळी सातनंतर मार्गस्थ होणार

विद्युत रोषणाई आणि विसर्जन मिरवणुकीत देखावा साकारणारे अन्य मंडळे सायंकाळी सातनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. लक्ष्मी रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन येणारी सर्व मंडळे फक्त बेलबाग चौकातूनच मुख्य मिरवणुकीत प्रवेश करतील. मानाचा पहीला कसबा गणपती मंडळाने टिळक चौक ( अलका चित्रपटगृह चौक) पार करेपर्यंत अन्य कोणतेही मंडळ त्या चौकात प्रवेश करणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना अटी

– विसर्जन मार्गावर ढोल ताशा पथकांना स्थिर वादनास मनाई

– प्रत्येक मंडळास जास्तीत जास्त दाेन ढोल पथकांना परवानगी, एका पथकात ६० सदस्य

– मिरवणुकीत ध्वनीवर्धक यंत्रणा किंवा ढोल पथकांचा समावेश, एकाच वेळी दोन पथकांना मनाई

– मुख्य मिरवणुकीत अंतर ठेवण्यास मनाई

– मिरवणुूक मार्गावर अन्य चौकातून प्रवेश करण्यास मंडळांना मनाई

– ढोल ताशा पथकांना लक्ष्मी रस्त्याने विरुद्ध येण्यास मनाई

गणपती विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाटी पोलिसांनी नियोजन केले आहे. मानाच्या मंडळासह अन्य मंडळांनी वेळ पाळण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धपणे पार पडेल, तसेच मिरवणुकीचा समाराेपही लवकर होईल.- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×