Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात ७०० सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा दणका

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिमंडळ दोनच्या हद्दीतील तब्बल ७०६ सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, आंबेगाव, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ट्रेडजइन्वेस्टमेंट कंपनीच्या संचालकांना अटक – सविस्तर बातमी 

‘महापालिका निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच सराइतांना जरब बसविण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारहाण, शिवीगाळ करणे, दहशत माजविणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक पार पडेपर्यंत सराइतांना परिमंडळ दोनच्या हद्दीत येण्यास मनाई करण्यात आली आहे’, असे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले.

कारवाई करण्यात आलेल्या सराइतांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. मात्र, परिमंडळ दोनच्या हद्दीतील सार्वजनिक कार्यक्रमात वावरणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

परिमंडळ दोनधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या ७०६ सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना त्वरित परिमंडळ दोनची हद्द सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. – मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×