Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण

दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – येरवडा कारागृहातील बराकीत झोपण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय भिकाजी कापडे (वय ५२) असे शिक्षा झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी कैदी भरत विशाल राठोड, मोहम्मद गुलाब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कुख्यात मयुर हजारे टोळीवर मोक्का – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत राठोड आणि मोहम्मद शेख हे येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. मारहाण झालेलेे कैदी संजय कापडे यांना शिक्षा झालेली आहे. रविवारी (७ सप्टेंबर) रात्री सव्वाआठच्या सुमारास येरवडा कारागृहातील बराकीत झोपण्याच्या कारणावरुन कापडे, राठोड, शेख यांच्यात वाद झाला. वादातून त्यांच्यात बाचाबाची झाली. राठोड आणि शेख यांनी खिळ्याने कापडे यांना मारहाण केला, तसेच त्यांच्या छातीत ठोसे मारले. कैद्यांमध्ये सुरू असलेली हाणामारीच्या घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी मध्यस्थी केली. कापडे यांना दुखापत झाल्याने त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी कारागृहास भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत. यापूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. तसेच कैद्यांकडे मोबाइल सापडले होते. कारागृहातून कैदी पसार होणे, मोबाइल सापडणे, तसेच हाणामारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×