पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उद्घाटन मोठ्या उत्साहात पार

राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅकचे आयोजन

marathinews24.com

पुणे – युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येते, राज्यात सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅकचे आयोजन दि.10 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.

आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा समारोप – सविस्तर बातमी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, मेरा युवा भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५- २६ चे आयोजन दि. 4 नोव्हेंबर २०२५ रोजी आबेदा इनामदार कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले.या आयोजनाला चॉईस कॉलेज, आणि राष्ट्रीय एकात्मता संघटना यांचे सहकार्य लाभले.

या महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, चित्रकला, वकृत्व, कविता लेखन, नव उपक्रम (विज्ञान प्रदर्शन) इत्यादी बाबींमध्ये वयोगट 15 ते 29 वयोगटातील युवक व युवतीनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील युवक-युवतींनी सांस्कृतिक, साहित्यिक व कौशल्य विकास विषयक सात स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

या स्पर्धेचे उद्घाटन युवराज पाटील,जिल्हा माहिती अधिकारी व डॉ. राहुल बळवंत (मराठी चित्रपट व सिरीयल दिग्दर्शक व अभिनेते) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी मान्यवरांचा सन्मान जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांनी केला. भारत हा युवकांचा देश आहे, युवकांमधील कौशल्याला प्रोत्साहन दिल्यास व त्यांच्या नव संकल्पना सादरीकरणास संधी दिल्यास युवक व युवती जागतिक स्तरावर भारताचे नाव चमकवतील. जगातील विविध देशामध्ये युवांची संख्या कमी होत आहे त्यामुळे भारतातमधून कौशल्य असणा-या युवांची मागणी मोठया प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर आपल्यात असणारे AI चा वापर करून आपल्याकडे असणाऱ्या कौशल्यांचा विकसित करण्यात यावे.

भाविष्यात भारतातील युवकांचे कौशल्याचा उपयोग इतर देशांना होवू शकतो. असे जिल्हा माहिती अधिकारी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. विजेते स्पर्धक पुढे विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील आणि आपल्यातील पूर्ण क्षमतानुसार आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्यात यावे अशी कलाकार स्पर्धकांकडून जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांनी मनोगतातून अपेक्षा व्यक्त केली.

त्याचप्रमाणे युवा महोत्सवाचा उपयोग युवकांना आपल्या कला सादरीकरणासाठी चांगल्या पध्दतीने होईल.युवकांनी आपल्या मधील कलाकाराला जन माणसामध्ये सादरीकरण करण्यास पुढे यावे हा युवा महोत्सव तरुणाईच्या कला, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरेल असे डॉ. राहुल बळवंत (मराठी चित्रपट व सिरीयल दिग्दर्शक व अभिनेते ) यांनी मनोगत व्यक्त केले.

उद्घाटन सोहळा जल्लोषात पार पडला व उत्साहाचा माहोल निर्माण झाला. यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी डॉ.आफताव अन्वर शेख, प्राचार्य चाफईस कॉलेज व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, ताहीर आसी (अध्यक्ष, राष्ट्रीय एकात्मता संघटना व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते), डॉ. रोशन आरा शेख (प्राचार्य, आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज), गुलजार शेख (क्रीडा संचालक, आझम कॅम्पस), प्रा. इम्तियाज आगा (उपप्राचार्य, आझम कॅम्पस),तसेच शेटे सर आणि चव्हाण सर (मेरा युवा भारत जिल्हा समन्वयक) हे मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन असद शेख यांनी केले, प्रस्ताविक दादासाहेब देवकते, क्रीडा अधिकारी यांनी केले व आभार अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×