Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

पुण्यात २ नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन

पुण्यात २ नोव्हेंबरला 'पुणे रन फॉर युनिटी' महामॅरेथॉन

राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांची माहिती

marathinews24.com

पुणे – भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा १५० वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. २ नोव्हेंबरला स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे येथे ‘पुणे रन फॉर युनिटी’, महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. प्रसंगी विशाल सातव, मनोज एरंडे, अमोल कविटकर, रमेश परदेशी, योगेश यावलकर, अरविंद बिजवे उपस्थित होते.

अपघात टाळण्याच्यादृष्टीने अवजड वाहन चालविताना विशेष काळजी घ्या-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम – सविस्तर बातमी 

मुरलीधर मोहोळ म्हणाले, उपक्रम सर्व वयोगटातील नागरिकांना फिटनेस, एकता आणि राष्ट्रीय सलोखा या मूल्यांभोवती एकत्र आणणारा मोठा सार्वजनिक क्रीडा सोहळा ठरणार आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात ‘रन फॉर युनिटी’ (राष्ट्रीय एकता दौड) या उपक्रमाचे आयोजन केले जाते. सुरुवातीला नवी दिल्ली, त्यानंतर मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, चंदीगड, जयपूर आणि लखनऊ या प्रमुख शहरांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला आहे. यंदा पुण्यात प्रथमच राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कुठलेही मूल्य आकारले जाणार नाही; परंतु आपले नाव रजिस्टर / नोंदवणे बंधनकारक आहे.”

‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अंदाजे २० हजार धावपटू सहभागी होणार आहेत. केनिया, इथिओपिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंना आमंत्रित केले आहे व त्यातील काही धावपटूंचा सहभाग निश्चित झाला आहे. तसेच भारत देशातील नामांकित राष्ट्रीय धावपटूंना देखील आमंत्रित केले आहे. विजेत्यांसाठी एकूण १० लाखांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. २१ कि.मी. श्रेणीत विजेत्या पुरुष व महिला खेळाडूंना प्रथम परितोषिक प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या ध्येयाला प्रत्यक्ष हातभार लावावा, तसेच सहभाग व नोंदणीसाठी सोबत दिलेल्या क्यूआर कोडचा उपयोग करावा, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

मॅरेथॉनमध्ये चार मुख्य धाव श्रेणी
२१ कि.मी.- हाफ मॅरेथॉन (टायमिंग चिपसह)

१० कि.मी.- स्पर्धात्मक धाव (टायमिंग चिपसह)

५ कि.मी.– फन रन

३ कि.मी.– फॅमिली व बिगिनर रन

असा असेल मॅरेथॉनचा मार्ग

स. प. महाविद्यालय येथून निघणारी २१ किमी मॅरेथॉन टिळक रोड, अलका चौक, फर्ग्युसन रोड, विद्यापीठ चौक मार्गे पाषाण, बावधनमार्गे पुन्हा विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड, भांडारकर रोडमार्गे अलका चौकातून पुन्हा स. प. महाविद्यालय येथे समारोप होईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×