राहुल गिरी यांचा होणार राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरव

राहुल गिरी यांचा होणार राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरव

२३ ऑगस्ट रोजी लातूर येथे होणार सन्मान

marathinews24.com

बीड प्रतिनिधी : अनंत जाधव – बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले राहुल गिरी हे आपल्या भाषण कौशल्याच्या बळावर सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. अत्यंत कमी वयात त्यांनी आपली अनोखी छाप महाराष्ट्रभर उमटवली आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे पहाडी शब्द आणि त्या प्रत्येक शब्दातून प्रवाहित होणारा गहन अर्थ ऐकणा-या प्रत्येकावर राहुल गिरी यांचा प्रभाव पाडल्याशिवाय राहत नाही. आपल्या कमी वयात बीड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या या तरुण युवकाने आजतागायत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत, त्यातच गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर च्या वतीने राहुल गिरी यांना यावर्षीचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता लातूर येथील, ब्लड बँक सभागृह,गांधी मैदान येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मार्वल दिवा फेज २ सोसायटीला अनोखा उपक्रम – सविस्तर बातमी 

अत्यंत सामान्य परिस्थितीतून बीड जिल्ह्याच्या ग्रामीण मातीत घडून पुढे आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर पुणे विद्यापीठातून अ + श्रेणीतून उच्च शिक्षण पूर्ण करत आज मराठवाड्याच्या दुष्काळा संबंधित विषयावर पीएचडी करत असलेल्या राहुल गिरी यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात जवळपास ४०० वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांची पारितोषिके मिळवली आहेत. राष्ट्रीय हिंदी भाषण प्रतियोगितेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळवणारा हा तरुण महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून संसद भवन दिल्ली येथे आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करायला उपस्थित राहिला तेव्हा तर सबंध महाराष्ट्राचा माथा अभिमानाने उन्नत झाला होता.

आजमितीला राज्यभर दररोज अनेक व्याख्यानांतून प्रबोधनाचे मौलिक कार्य राहुल गिरी पार पाडत आहेत.अत्यंत कमी वयात महाराष्ट्रभर आपला नावलौकिक मिळवून बीड जिल्ह्याच्या या भूमिपुत्राने आपले वक्तृत्व कौशल्य आणि स्वभाववैशिष्ट्ये यांमुळे अत्यंत दांडगा जनसंपर्क जमवला असून बीड वासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. राज्यातल्या जवळपास सर्व प्रमुख व्याख्यानमाला आणि उंचीच्या कार्यक्रमांत राहुल गिरी यांचे विचार श्रवण करायला जमणारी गर्दी त्यांचे नावलौकिक दर्शवणारी आहे

गोसावी समाज प्रतिष्ठान,लातूर च्या वतीने राहुल गिरी यांना मिळत असलेल्या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने त्यांच्या गौरवात अधिक भर घातली आहे. दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता लातूर येथील, ब्लड बँक सभागृह,गांधी मैदान येथे संपन्न होत असलेल्या या पुरस्कार वितरणासाठी विविध स्तरांतून राहुल गिरी यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×