Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

दौंड तालुक्यात महसूल सप्ताहाचे आयोजन

दौंड तालुक्यात महसूल सप्ताहाचे आयोजन

अधिकाधिक नागरिकांनी या सप्ताहात सहभागी होवून लाभ घ्यावा उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे यांचे आवाहन 

marathinews24.com

पुणे – दौंड तालुक्यात महसूल सप्ताहाचे आयोजन – महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, विविध योजनांची माहितीसह अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळण्याकरिता 1 ते 7 ऑगस्ट 2025 कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सप्ताहात सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू – सविस्तर बातमी 

यामध्ये 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ, 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

3 ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, 4 ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, 5 ऑगस्ट रोजी विशेष साहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे, संगायो व पुरवठा लाभार्थींचे ई केवायसी पूर्ण करणे, 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व ती अतिक्रमणमुक्त करणे, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे, कब्जेहक्क भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींची तपासणी करणे आणि 7 ऑगस्ट रोजी एम-सँड (M-Sand) धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ याबाबत कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असेही श्री. लबडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×