Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

किशोर’ दिवाळी अंकाचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी केले प्रकाशन

मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रकाशन

marathinews24.com

मुंबई – बाल भारतीच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आज महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमास शालेय शिक्षण विभागाचे सचिव रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कैलाश पगारे, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, नियंत्रक हेमंत बाबर, किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे व शिक्षण विभाग सुकाणू समिती सदस्य उपस्थित होते.

गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी

मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावं, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कोवळ्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने गेली 54 वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते . किशोरचा दिवाळी अंक हा नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असतो. यंदाचा ‘किशोर’चा अंक बाल आणि किशोर या दोन्ही गटांतील मुलांसाठी रंजक, बोधप्रद आणि संस्कारक्षम असा आहे. मुलांच्या आकलन शक्तीचा अंदाज घेऊन अंकातील विषय आणि भाषाशैली निवडण्यात आली आहे.

अंकात अनेक मान्यवरांनी लेखन केलं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महावीर जोंधळे, अंबरीश मिश्र, श्रीकांत बोजेवार, राजीव तांबे, प्रवीण दवणे, वंदना भागवत, दासू वैद्य, संजय भास्कर जोशी,अच्युत गोडबोले अशी अनेक मोठी नावं आहेत. कथा, कविता, ललित, लेख, कोडी आणि कार्टून असा भरगच्च मनोरंजक मजकूर आणि आकर्षक चित्र यांनी सजलेला हा दिवाळी अंक आहे. या अंकाचे मुखपृष्ठ ख्यातनाम चित्रकार रेश्मा बर्वे यांनी चितारले आहे. बाल आणि किशोर वाचकांसह मोठ्या वयाच्या वाचकांनाही हा अंक नक्कीच आवडेल असा आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×