Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

सेवा पंधरवाडा कार्यक्रम पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच

जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ मिळणार

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात येणार आहे; या अभियानाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे करण्यात येणार आहे, याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत पूर्व तयारी आढावा बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या परवानगीने आयोजित बैठकीत यावेळी तहसीलदार श्वेता पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

कदम म्हणाल्या, या कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या तसेच अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे, त्यामुळे सर्व संबंधित विभागाने विहीत वेळेत कार्यवाही होण्याच्यादृष्टीने नियोजन करुन कामे करावीत. लाभार्थ्यांची संख्या विचारात घेता वाहन व वाहनतळाची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या दिवशी गणेश कला क्रीडा रंगमंच यैथे विविध विभागाच्या सेवांबाबत दालने (स्टॉल) लावावीत, यामध्ये महिला बचत गटांचा समावेश करावा. राज्यस्तरीय कार्यक्रमाची व्याप्ती विचारात घेता सर्व संबंधित विभागानी समन्वयाने कामे करावीत.

बैठकीत कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभागृह सुशोभिकरण, भोजन व अल्पोहार व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रचार व प्रसिद्धी, वैद्यकीय सहाय्य व रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, मंच, विद्युत, सुरक्षा, लाभार्थी, अधिकारी व कर्मचारी, पत्रकारांची बैठक व्यवस्था आदी बाबत आढावा घेण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×