Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शेअर ट्रेडींगच्या टीप्स पडल्या दीड कोटींना

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

सहकारनगरमधील जेष्ठाला गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीसाठी टीप्स देण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी एका जेष्ठ नागरिकाला तब्बल १ कोटी ५२ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ७ डिसेंबर २०२५ ते ७ फेबु्रवारी २०२६ कालावधीत सहकारनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सतीश करंदीकर वय ६५ यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व बँक खातेधारकाविरूद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सायबर घोटाळ्याच्या नावाखाली १ कोटी ६२ लाखाचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार करंदीकर हे सहकारनगमध्ये राहायला असून, ७ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठविला होता. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या टीप्स देतो, अशी बतावणी करण्यात आली. त्यानंतर काही दिवस सायबर चोरट्यांनी त्यांना मेसेज पाठवून विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीला भाग पाडले. सायबर चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत १ कोटी ५२ लाख रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×