Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

युवा सक्षमीकरणाचे शिकारपूर सोशल फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय- डॉ. विजय भटकर

युवा सक्षमीकरणाचे शिकारपूर सोशल फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय- डॉ. विजय भटकर

शिकारपूर सोशल फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

marathinews24.com

पुणे – आधुनिक युगात शैक्षणिक व रोजगार क्षेत्रातील सातत्याने बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व आहे. कौशल्य विकास म्हणजे केवळ औपचारिक शिक्षण नसून विविध विषयातील कौशल्यांना आत्मासात करणे व त्यातून रोजगारक्षम बनण्याची क्षमता विकसित करणे होय, असे मार्गदर्शन पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी विद्यार्थ्यांना केले. युवा सक्षमीकरणाचे शिकारपूर सोशल फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

“आयुर्वेद-युनानी महाविद्यालयांना शासनमान्य सेवा नियम लागू करावेत”, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी – सविस्तर बातमी

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर यांच्या शिकारपूर सोशल फाऊंडेशनच्यावतीने गुणवंत परंतु पुरेसे आर्थिक पाठबळ नसणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना कौशल्य विकासात मदतीचा हात देत रोजगारक्षम बनविण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिष्यवृत्ती डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मल्टिव्हर्सिटी ग्रुप, आय-स्पेस, बावधन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, शिकारपूर सोशल फाऊंडेशनतर्फे कौशल्य विकास, रोजगार क्षमता या क्षेत्रात कार्य करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत क्लिक अभ्यासक्रमाद्वारे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, त्यांची सुनियोजित तयारी, कौशल्य विकास, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण, इंनर्शनशिपसाठी तयारी तसेच रोजगार मिळविण्यासाठी मदत पुरविली जाते. या अतंर्गत 25 विद्यार्थ्यांना सक्षम करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक अनिकेत मारणे यांनी आभार मानले. यावेळी मल्टिव्हर्सिटी ग्रुपचे सीईओ नचिकेत भटकर, अमित खापरे, विश्वजीत उत्तरकर, श्रीरंग इनामदार, पल्लवी शर्मा उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×