Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

हिंद-दी-चादर’कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधी समाजाचे सहकार्य-सुरेश हेमनानी

३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्यभरातून सहभागाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सिंधी समाजाचा पाठींबा असून कार्यकम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन भारतीय सिंधू सभाचे महाराष्टाचे अध्यक्ष सुरेश हेमनानी यांनी केले.

राज्यातील महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना – सविस्तर बातमी

‘हिंद-दी-चादर’ च्या पार्श्वभूमीवर भारतीय सिंधी सभेच्यावतीने पुणे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य चरणजितसिंग साहनी, भारतीय सिंधी सभेच्या पुणे शाखा अध्यक्ष जितेंद्र अडवाणी, उपाध्यक्ष ज्ञान रोहेरा, सरचिटणीस जितेंद्र हिरानंदानी,महिला शाखा अध्यक्षा रेश्मा खियानी, महिला शाखा कार्याध्यक्ष निर्मला दादलानी, महिला शाखा उपाध्यक्षा रोमा खेमचंदानी आदी उपस्थित होते.

सुरुवातीला श्री. साहनी यांनी हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

हेमनानी म्हणाले, भारतीय सिंधी सभातर्फे १ मार्च रोजी खारघर कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था, अल्पोपहार, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता आणि धर्मसंरक्षणाच्या विचारांचा प्रसार करणारा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधी समाजातील नागरिकांनी सक्रीयपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. हेमनानी यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×