Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

माजी सैनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी, बांग्लादेशी म्हणणे भोवले

चंदननगर पोलीस

अखेर ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बांगलादेशी ठरवून माजी सैनिकाच्या घरासमोर संघटनेने घोषणाबाजी करुन गोंधळ घातल्याची घटना २६ ते २७ जुलैला चंदननगर भागात घडली होती. याप्रकरणी आता संबंधित संघटनेच्या ६ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटिज या संघटनेकडून नुकतीच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत कारवाईची मागणी केली होती.

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन – सविस्तर बातमी 

खुशल पवार (रा. दुर्गामाता मंदीराजवळ), शांताराम कावरे (रा. मथुरानगर सोसायटी), गणेश खवणे (रा. निरामय रूग्णालयाजवळ), सुरज जाधव (रा. पठारे वस्ती), गणेश शिंदे (रा. वडगाव शेरी), साईराज पवळे (रा. पुण्यनगरी समोर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप धुमाळ यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बेकायदेशीर जमाव जमविणे, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे, दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

चंदननगर भागात माजी सैनिक कुटुंबीयांसह राहायला आहे. २६ जुलैला रात्री सव्वा अकराच्या सुमारास काही संघटनांचे कार्यकर्ते फातिमा मंजील पठारे शाळेजवळ गेले. त्यांनी माजी सैनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी करीत संबंधितांच्या कुटुंबीयांना बांगलादेशी असे संबोधिले होते. तसेच साक्षीदार शशाद शेख वय ३५ यांच्या घरात शिरून टोळक्याने पॅनकार्ड दाखविण्यासाठी शिवीगाळ केली. अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करीत मारहाण केली. पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांना जिहादी संबोधित करून त्यांची बदनामी केली. त्यांच्या समाजाच्या भावना दुखाविण्यासाठी खोटे मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली. घटनेनंतर पोलीस उपायुक्त,सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षकांनी भेट दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×