Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

सायकलिंग फेडरेशनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करा

सायकलिंग फेडरेशनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या सूचना 

marathinews24.com

पुणे – ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धा’ भारताकरिता प्रतिष्ठेचा विषय आहे, त्यामुळे स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलपट्टूंना दर्जेदार, अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळेल यादृष्टीने नियोजन करा, सायकलिंग फेडरेशनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता, जिल्हा शैल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी,पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, खाजगी रुग्णालयाचे संचालक यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे ग्रँड चॅलेज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक आदी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेच्या वैद्यकीय पथक, औषधे, खाटा, प्रयोगशाळा, अतिदक्षता विभाग, सुसज्ज रुग्णवाहिका रुग्णवाहिका, अत्याधुनिक मशीन आदी आवश्यक त्या सर्व बाबी उपल्बध राहील, याबाबत दक्षता घ्या. स्पर्धेच्या मार्गावर वैद्यकीय सुविधा पुरविण्यादृष्टीने केंद्र निश्चित करावे, यामध्ये कोणत्याही आपत्कालिन परिस्थितींत सायकलपट्टूंना तात्काळ प्रतिसाद मिळेल यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. याकामी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. आरोग्य सुविधा प्रभावीपणे पुरविण्याकरिता आपल्यास्तरावर सुक्ष्म नियोजन करावे, ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता समर्पित भावनेने काम करावे.

या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी आहे, ‘पुणे वैद्यकीय हब’ च्यादृष्टीने आपल्या काही सूचना असल्यास कळविण्याचे श्री. डुडी यांनी आवाहन त्यांनी केले.

बायसकी यांनी बैठकीत सुसज्ज रुग्णवाहिका आणि यामध्ये प्रशिक्षित वाहनचालक, स्वयंसेवक, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, आपत्कालिन प्रतिसाद, एककेंद्री समन्वय यंत्रणा आदी बाबत माहिती दिली. स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे स्पर्धकांच्या आरोग्य विषयक प्रोटोकॉलचे पालन करावे. आपत्कालिन प्ररिस्थितीत तात्काळ प्रतिसाद दिल्यास परिस्थितीवर आपण मात करु शकतो, यादृष्टीने पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात यावे, असेह बायसकी म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×