कात्रज- मंतरवाडी रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल 

मागविल्या नागरिकांच्या सूचना

marathinews24.com

पुणे – पुणे शहरातील काळेपडळ वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या आदेशानुसार (क्र. एम.व्ही.ए. ०११६/८७१/सीआर ३७/ठीआरए २, दिनांक २७ सप्टेंबर १९९६) आणि मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(२)(बी), ११६(४) व ११७ अन्वये पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) हिंमत जाधव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून कात्रज मंतरवाडी रोड व हांडेवाडी चौक परिसरात प्रायोगिक स्वरूपात खालीलप्रमाणे तात्पुरते वाहतुकीचे बदल लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.का

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ शनिवारी – सविस्तर बातमी

ळेपडळ वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या या प्रायोगिक बदलांनुसार – श्रीराम चौक (जे.एस.पी.एम. कॉलेज) ते हांडेवाडी चौक मार्गावरून होळकरवाडी व कात्रजकडे जाणारी दुचाकी, चारचाकी व हलकी मोटार वाहने डावीकडे वळतील. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडीच्या दिशेने १०० मीटर पुढे जाऊन जोगेश्वरी मिसळ हॉटेलसमोरून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन इच्छित स्थळी जाता येईल.

त्याच मार्गावरील जड व अवजड मोटार वाहनांनी मंतरवाडीच्या दिशेने २५० मीटर अंतरावर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील हॉनेस्टी स्टील दुकानाजवळून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घ्यावा.
होळकरवाडी व मंतरवाडी येथून येणारी दुचाकी व हलकी वाहने हांडेवाडी चौकातून कात्रजच्या दिशेने १०० मीटर पुढे जाऊन शिवेंद्र हॉटेलसमोरून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन श्रीराम चौक, सय्यदनगर, हडपसर या दिशेने जाता येईल.

होळकरवाडी व मंतरवाडी येथून येणाऱ्या जड व अवजड वाहनांना कात्रजच्या दिशेने २५० मीटर पुढे जाऊन मयुरी वजनकाटा परिसरातून घृव शाळेसमोर उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन पुढे इच्छित स्थळी जाता येईल. नागरिकांना कळविण्यात येते की, या तात्पुरत्या प्रायोगिक वाहतूक बदलांबाबत आपल्या सूचना व हरकती १६ नोव्हेंबर 2025 दरम्यान लेखी स्वरूपात पोलीस उपायुक्त (वाहतूक नियंत्रण शाखा), बंगला क्र. ६, एअरपोर्ट रोड, येरवडा पोस्ट ऑफिससमोर, पुणे येथे सादर करता येतील. प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम आदेश जाहीर करण्यात येतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यांना सूट देण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×