Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या बंगल्यात चोरी

नोकरानेच आई-वडिलांसह ५ जणांना बेशुद्ध करीत केली चोरी

marathinews24.com

पुणे – खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करत प्रशासकीयपदी विराजमान झालेल्या वादग्रस्त माजी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यात नोकरानेच चोरी केली आहे. त्याने खेडकर दाम्पत्यासह पाच जणांना बेशुद्ध करीत चोरीचा प्रयत्न केला आहे. ही घटना ११ जानेवारीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सकाळनगरमधील नॅशनल हौसिंग सोसायटीतील बंगला क्रमांक ११२ मध्ये घडली आहे. खेडकर दाम्पत्य, जितेंद्र सिंग (सुरक्षारक्षक), दादासाहेब ढाकणे (वाहन चालक) सुजीत रॉय (कुक) अशी बेशुद्ध केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपीच्या शोधार्थ चतुःशृंगी आणि गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.

पुणेकरांनो, गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार तुमच्या प्रभागाचे उमेदवार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिल औंधमधील सकाळनगर परिसरातील बंगल्यात पूजा खेडकर हिचे आई वडील राहायला आहेत. त्यांच्याकडे मोटार चालक, स्वयंपाकी (कुक), सुरक्षारक्षक कामाला आहेत. काही दिवसांपुर्वी नेपाळहून आलेला एकजण त्यांच्या बंगल्यात कामाला होता. ११ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास नेपाळी कामगाराने सुरक्षारक्षक जितेंद्र सिंग याला अर्धवट बेशुद्ध केले. त्यानंतर खोलीत जाउन त्याने स्वयंपाकी (कुक) यालाही तशाच पद्धतीने बेशुद्ध केले. काही वेळानंतर त्याने शयनगृहात झोपलेल्या खेडकर दाम्पत्याला बेशुद्ध केले.

बंगल्यात चोरीच्या उद्देशाने संबंधित नेपाळी कामगाराने इतरांना बेशुद्ध केले. याप्रकरणाची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बंगल्यातील लाकडी कपाटातील सामान जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच इतर तीन खोलींची पाहणी केली असता तेथेही कपाटातील साहित्य खाली पडले होते. दरम्यान, बेशुद्ध असलेल्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, माझ्या आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्याने मी नंतर तक्रार देते असे पूजा खेडकर यांनी पोलिसांना सांगितले आहे .

प्राथमिक तपासात बंगल्यात चोरीच्या उद्देशाने घरातील नोकरानेच ५ जणांना अर्धवट बेशुद्ध केले. चोरी करून संबंधित नोकर पसार झाला आहे. त्याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले आहे. – चुलुमुला रजनीकांत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×