Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शिवजयंती उत्सवानिमित्त जुन्नर शहरात १८ ते १९ फेब्रुवारीदरम्यान वाहतूक बदल

शिवजयंती उत्सवानिमित्त जुन्नर शहरात १८ ते १९ फेब्रुवारीदरम्यान वाहतूक बदल

शिवजयंती उत्सवानिमित्त जुन्नर शहर व परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल

marathinews24.com

पुणे – शिवनेरी किल्ला, ता. जुन्नर येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त तसेच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय पूजेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर शहर व परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ते दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येणार असून सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये दिले आहेत.

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन – सविस्तर बातमी 

शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने शिवभक्त शिवज्योत घेऊन शिवनेरी किल्ल्यावर दाखल होत असतात. तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार असून विविध मंत्री व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दि. १८ व १९ फेब्रुवारीदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविक व वाहनांची गर्दी अपेक्षित असल्याने पुढीलप्रमाणे वाहतूक बदल करण्यात आले आहेत:

१) नारायणगाव येथून जुन्नरकडे येणारी अवजड वाहतूक वरील कालावधीत पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
२) नारायणगावहून जुन्नरकडे येणारी इतर वाहने घोडेगाव फाटा, खानापूर कॉलेज मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे जाऊन ताथेड पार्किंग येथे उभी करण्यात येतील.
३) ताथेड पार्किंग येथे उभी केलेली वाहने परतीच्या प्रवासासाठी वडज, सावरगाव, यासळवाडी, नारायणगाव, घोडेगाव मार्गे जातील.
४) गणेशखिंड-बनकफाटा-ओतूर मार्गे येणारी वाहने मुंढे हायस्कूल व परिसरातील पार्किंग ठिकाणी उभी करून परतीसाठी कल्याण-अहिल्यानगर, नाशिक मार्गे जातील.
५) आपटाळे-सोमतवाडी (ता. जुन्नर) येथून येणारी वाहने प्रदक्षिणा मार्गे हॉटेल शिवबा समोरून ताथेड पार्किंग येथे जातील व परतीसाठी वडज मार्गाचा वापर करतील.

नागरिकांनी व वाहनचालकांनी या आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×