Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

“आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी’ निघाली रॅली; युवक- युवती मोठ्या संख्येने सहभागी

"आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी' निघाली रॅली; युवक- युवती मोठ्या संख्येने सहभागी

छत्रपती संभाजी मैदान ते शनिवारवाडा यादरम्यान पार पडली रॅली

marathinews24.com

पुणे – समाज कल्याण विभाग स्थापना दिन व व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी” या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी मैदान ते शनिवारवाडा यादरम्यान हजारो युवक-युवतींच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली.

येवले अमृततुल्यची ठाम भूमिका – आम्ही कोणताही कायदा मोडलेला नाही” – सविस्तर बातमी 

या रॅलीचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव अमोल स. भा. मडामे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी नशाबंदी मंडळाचे विचार मासिक “कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा” याचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कल्याणयात्रा चे संपादक अमोल मडामे, होप व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. विजय मोरे, नशाबंदी मंडळाचे विभागीय संघटक प्रमुख ऍड. सुरेश सकटे, पुणे जिल्हा संघटक डॉ. फडके, पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

रॅलीच्या सुरुवातीला कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पथनाट्य सादरीकरणाचे कौतुक सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी केले. रॅलीच्या नियोजनात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती संसारे यांचा सत्कार सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.

रॅली छत्रपती संभाजी मैदान येथून सुरू होऊन पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून शनिवारवाड्यापर्यंत मार्गक्रमण करत पार पडली. रॅलीच्या अखेरीस शनिवारवाड्याच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्याकडून देण्यात आली.

यावेळी नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक व रॅलीचे संयोजक अमोल मडामे यांनी सांगितले की, “निर्व्यसनी तरुण पिढी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांना व्यसनमुक्त जीवनाकडे प्रवृत्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले. सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “व्यसनमुक्त जीवनातूनच व्यक्तीचा उत्कर्ष साध्य होऊ शकतो आणि त्यातूनच समाजसेवा शक्य आहे.”

या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे विभागीय संघटक प्रमुख ऍड. सुरेश सकटे आणि पुणे जिल्हा संघटक डॉ. फडके यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी नशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर. के. गायकवाड हेही उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×