वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – निष्काळजीपणे चारचाकी वाहन चालवून रस्त्यावर झोपलेल्या एकाच्या अंगावरून वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला. विशाल क्षीरसागर असे मयताचे नाव आहे. विशालचा भाऊ गौरव याने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात चारचाकी चालक अनिकेत विलास गरुड (३५, रा. शुक्रवार पेठ, सुभाषनगर, गल्ली नं. १) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा मंगळवारी (दि. २८) कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या यशश्री पार्कच्या
गेटसमोर झोपला होता. पहाटे चारच्या सुमारास अनिकेत त्याच्या ताब्यातील एसयुव्ही निष्काळजीपणे व हयगयीने चालवत त्याने कार विशालच्या अंगावर घातली. यात विशाल गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्य झाला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भरसट करत आहेत.





















