Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पीएमपी थांब्यावर शाळकरी मुलावर शस्त्राने वार

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

स्वारगेट पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपी बसची वाट पाहत थांबलेल्या शाळकरी मुलावर किरकोळ वादातून शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. मुलाच्या हाताला दुखापत झाली असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेत १४ वर्षीय मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना माहिती दिल्याचा आरोप; तरुणावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १४ वर्षीय मुलगा कोंढव्यातील बधेनगर भागात राहायला आहे. तो सोमवारी (१ डिसेंबर) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घरी निघाला होता. महर्षीनगर भागातील पुजारी उद्यानाजवळ असलेल्या पीएमपी थांब्यावर तो थांबला होता. त्यावेळी तेथे एक जण आला. त्याने मुलाकडे रागाने बघितले आणि अचानक त्याच्याकडे असलेल्या शस्त्राने मुलाच्या हातावर वार केला. मुलाने आरडाओरडा के्ल्यानंतर आरोपी दोन साथीदारांसाेबत तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भारमळ यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट तपास करत आहेत.

पर्वती परिसरात शाळकरी मुलाला मारहाण

पुणे-नीलायम चित्रपटगृह परिसरात शाळकरी मुलावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १६ वर्षीय मुलाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगा पर्वती दर्शन भागात राहायला आहे. त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तो नीलायम चित्रपटगृह परिसरात थांबला होता. त्याने मित्राला बोलावून घेतले. त्यानंतर तेथे आलेल्या चौघांनी जुन्या वादातून शाळकरी मुलावर शस्त्राने वार केले. गेल्या महिन्यात ही घटना घडली. याबाबत मुलाने नुकतीच पोलिसंकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार दिघे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×