Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पोलिसांना माहिती दिल्याचा आरोप; तरुणावर शस्त्राने वार

पोलिसांना माहिती दिल्याचा आरोप; तरुणावर शस्त्राने वार

भारती विद्यापठ पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन तिघांनी एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज भागात घडली. आरोपींनी दहशत माजवून ट्रकची काच फोडली. याप्रकरणी भारती विद्यापठ पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नशेच्या ६ हजार ९०० गोळ्या जप्त; दोघांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण ट्रकचालक आहे. तो कात्रजमधील खोपडेनगर भागात राहायला आहे. ३० नोव्हेंबर रोजी तो किराणा माल दुकानातून साहित्य घेऊन घरी निघाला होता. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास तिघांनी त्याला अडवले. ‘आमची माहिती पोलिसांना का दिली ?’, अशी विचारणा करुन आरोपींनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने वार केले. तरुणाने घरासमोर ट्रक लावला होता. आरोपींनी घरासमोर लावलेल्या ट्रकची काच फोडून दहशत माजविली. सहायक फौजदार भोसले तपास करत आहेत.

याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी खोपडेनगर भागात दहशत माजवून एका दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली. आरोपींकडून दाम्पत्याला मारहाण सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी त्यांची मुलगी आली. तेव्हा आरोपींनी मुलीला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×