Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

एकाच वेळी ६ जण तडीपार, पोलीस उपायुक्तांचा दणका

आरोपींविरूद्ध तडीपारीची कारवाई

हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरातील गुंड कचाट्यात

marathinews24.com

पुणे – एकाच वेळी ६ जण तडीपार, पोलीस उपायुक्तांचा दणका – नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत गुन्हे करणार्‍या गुंडाविरूद्ध तडीपार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ पाचच्या हद्दीत असलेल्या हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरातील ६ गुंड प्रवृत्तीच्या सराईतांविरूद्ध दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले आहेत.

पुण्यात बांग्लादेशींची धरपकड, १५ महिलांना डिपोर्ट करणार – सविस्तर बातमी 

इम्तीयाज इद्रीस मेमन (४५, रा. विठ्ठलनगर, हडपसर), गणेश बबन लोंढे (२४, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी), अविनाश अजय मिसाळ (२४, घोरपडी बाजार पोलिस चौकी), हुसेन अब्बास पटेल (२३, गणराज पार्कजवळ, शिवनेरीनगर, कोंढवा), आकाश़ नरसया गुत्तेदार (२४, रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) आणि आदित्य तानाजी पांडागळे (२०, रा. काटे चाळ, कोंढवा खुर्द) अशी तडीपार केलेल्या सहा गुन्हेगारांची नावे आहेत.

गंभीर गुन्हे असल्यानेच संबंधित आरोपींविरूद्ध तडीपारीची कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी २०२५ पासून परिमंडळ पाचने आतापर्यंत १३ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच मोक्का कारवाईमध्ये ५६ गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. तसेच आजपर्यंत २५ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. असे एकूण ९४ सराईत गुन्हेगारांवर परिणाम कारवाई केली आहे. दरम्यान वरील गुन्हेगार शहरासह, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व जिल्ह्यामध्ये आढळल्यास पुणे पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांची दिशाभूल भोवणार, त्या तरूणीवर गुन्हा दाखल होणार

पुणे – कुरिअर बॉयने अंगावर स्प्रे मारून अत्याचार केल्याची खोटी फिर्याद देउन, तरूणीने कोंढवा पोलिसांची दिशाभूल केली होती. खोटी माहिती आणि साक्ष देणे तक्रारदार तरूणीच्या अंगलट येणार आहे. तिच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली असून, न्यायालयीन आदेशानंतर तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.

कोंढव्यात राहणार्‍या तरूणीने आपल्याला कुरिअर बॉयने बेशुद्ध करीत बलात्कार केल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे संपुर्ण शहरासह राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेतील तब्बल ६०० पोलीस तपासात गुंतले होते. तपासादरम्यान, संबंधित तरूणीनेच तिच्या मित्राला घरी बोलावून घेतले. संमतीने शरीरसंबंध झाल्यानंतर तिने मानसिक स्वास्थ ठीक नसल्याचे कारण देत तक्रार दाखल केली होती. मात्र, याप्रकरणी आता पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणात तिच्याविरूद्ध खोटी माहिती देणे, खोटी साक्ष दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×