पीेएमपी बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

धायरी परिसरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

पुणे स्टेशन परिसरात घटना 

marathinews24.com

पुणे – पीएमपी बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रीती विद्यासागर वेंगल असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याबाबत सुजीत संतोष भंडारी (वय २७, रा. मांजरी, हडपसर) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती वेंगल शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून निघाल्या होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव पीएमपीच्या धडकेत त्यांचा चाकाखाली सापडून मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×