Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

चंदननगर पोलीसांकडून तरुणाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांकडून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अरबाज रशीद शेख (वय २७, रा. जयहिंद चौक, साईनाथनगर मूळ रा. कसाई गल्ली, बारामती, जि. पुणे) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीने चंदननगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी शेख याची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. आरोपीने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तिला एका हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मोबाइलवर काढलेली छायाचित्रे पीडित तरुणीची आई आणि भावाला पाठविण्याची धमकी देऊन त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने तिला मारहाण करुन शिवीगाळ केली. आरोपीच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×