दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

वर्धा कारागृहात केले स्थानबद्ध

marathinews24.com

पुणे – शहरातील पद्मावती भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुंडाची रवानगी वर्धा येथील कारागृहात करण्यात आली असून, त्याला वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात येणार आहे. साहिल गणेश वायदंडे (वय २५, रा. बिक्कड दवाखान्याजवळ, तळजाई माता वसाहत, पद्मावती) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन ठार – सविस्तर बातमी

सराईत वायदंडे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे, वाहनांची तोडफोड करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाला नव्हती. तो तळजाई वसाहत भागातील रहिवाशांना धमकावित होता. त्याच्या दहशतीमुळे रहिवासी पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. वायदंडे याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलिसांनी तयार केला. संबंधित प्रस्ताव परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार वायदंडे याची रवानगी वर्धा येथील कारागृहात करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुरेखा चव्हाण, उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर, फिरोज शेख, सहायक फाैजदार बापू खुटवड, हवालदार अमोल पवार, विनायक एडके, गोरख ढगे, हरिश्चंद्र चोरमले, मारोती नलावडे, किरण कांबळे, सागर सुतकर, अमित पद्मनाळे, महेश भगत यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×