Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालय तरुण ठार

Dive Ghat ST Bus Accident

हडपसरमधील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील जेएसपीएम महाविद्यालय चौकात सोमवारी सायंकाळी घडली. पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अभिजित गणेश रेवले (वय १९, रा. संकेत विहार सोसायटी, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचन कराळे (वय ४२) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. सोमवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीस्वार अभिजित हडपसरमधील जेएसपीएम महाविद्यालय परिसरातून निघाला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने दुचाकीस्वार अभिजितला धडक दिली. अपघातात अभिजीत गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

बसच्या धडकेत पादचारी तरुणीचा मृत्यू

पीएमपीएल बसच्या धडकेत पादचारी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्रीती विद्यासागर वेंगल (वय २६, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणीचे नाव आहे. याबाबत सुजित संतोष भंडारी (वय २७, रा. मांजरी, हडपसर) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती वेंगल या खासगी कंपनीत कामाला होत्या. रविवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून निघाल्या होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव पीएमपीच्या धडकेत त्यांचा चाकाखाली सापडून मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×