मंडई मेट्रो स्थानकातील घटना
marathinews24.com
पुणे – मेट्रो प्रवासी महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या जेष्ठ नागरिकाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलेला आरोपी मूळचा बिहारमधील मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बाणेर, चंदननगर भागात घरफोडी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मंगळवारी (९ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास मेट्रोतून प्रवास करत होती. त्यावेळी आरोपीने महिलेकडे एकटक पाहून इशारे केले. त्याने महिलेची मोबाइल कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांना दिली. प्रवाशाला ताब्यात घेऊन मंडई पोलीस चौकीत आणण्यात आले. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ६५ वर्षीय प्रवाशाविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३५ (३) नोटीस बजाविण्यात आली आहे. अश्लिल वर्तन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.
रिक्षा प्रवासी तरुणाला मारहाण करुन लूटले
पुणे – प्रवासी तरुणाला मारहाण करुन रिक्षाचालक आणि साथीदारांनी त्याच्याकडील मोबाइल, तसेच रोकड असा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षा चालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत तरुणाने लोेणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रिक्षाचालकासह चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीत राहायला आहे. तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात असलेल्या उदतपूर गावचा रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वी तो दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरुन रिक्षातून निघाला होता. रिक्षात चालकासह चौघे साथीदार हाेते. रिक्षा चालकाने कदमवाक वस्ती परिसरातील एका हाॅटेलजवळ रिक्षा थांबविली. तरुणाला मारहाण करुन त्याच्यकडील मोबाइल आणि खिशातील ३ हजार ५०० रुपये असा मुद्देमाल लुटून रिक्षाचालक आणि साथीदार पसार झाले. घाबरलेल्या तरुणाने मंगळवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.






















