Breking News
मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरलाजनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

पुण्यात मोटारीच्या धडकेत दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारीच्या धडकेत दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगावमधील हवाई दलाच्या वसाहतीत घडली. याप्रकरणी मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदार्थ विपीन मावी (वय दोन) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत विदार्थचे वडील विपीन राजसिंग मावी (वय ३४, सध्या रा. हवाई दल वसाहत, लाेहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रभूषण चौकात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपीन मावी हे हवाई दलात अधिकारी आहेत. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा विदार्थ गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास हवाई दल वसाहतीतील घरासमोर खेळत होता. त्यावेळी वसाहतीत राहणाऱ्या मोटार चालक महिलेने घरासमोर खेळणाऱ्या विदार्थला धडक दिली. अपघातात विदार्थ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपाचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटार चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार धेंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×