Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर लाेणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाकल केला. नारायण शाहूराज सूर्यवंशी (वय ३६) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत किरण रमेश कात्रे (वय ३३ ,रा. साईश्रद्धा पार्क, गोपाळपट्टी, मांजरी, हडपसर ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंड सोमनाथ गायकवाड टोळीही आंदेकर टोळीच्या रडारवर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रे यांचा आतेभाऊ नारायण सूर्यवंशी हे शुक्रवारी (१२ सप्टेंबर) पहाटे सव्वापाचच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी परिसरातून निघाले होते. त्यावेळी पाठीामगून भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता रिक्षाचालक पसार झाला. सूर्यवंशी यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बिनवडे तपास करत आहेत.

शहरात गेल्या दोन दिवसात वेगेवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. लोहगावमधील हवाई दलाच्याा वसाहतीत मोटारीच्या धडकेत घरासमोर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील राष्टभूषण चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर सोलापूर रस्त्यावर रिक्षाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×