Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

स्वारगेट मेट्रो स्थानक पुणेकरांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब ठरेल

स्वारगेट मेट्रो स्थानक पुणेकरांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब ठरेल

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विश्वास

marathinews24.com

पुणे – आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच; कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब देखील ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पाटील यांनी स्वारगेट मेट्रो स्थानकास भेट देऊन; स्थानकाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचलन व प्रणालीचे संचालक विनोदकुमार अग्रवाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला व बालकांच्या आरोग्य तपासणी – सविस्तर बातमी 

मंत्री पाटील म्हणाले, स्वारगेट बस स्थानक हे पुण्याीतल सर्वात व्यस्त बस स्थानक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक पुण्यात येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकाचाच वापर करतात. यापूर्वी स्वारगेटला आलेला प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पीएमपीएमएल किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, पुण्याच्या उदरात तयार झालेले मेट्रो स्टेशनला आताच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आराखडा अतिशय भव्य स्वरूपाचा आहे. हे स्टेशन एका मोठ्या मल्टीमोडल हबमध्ये विकसित केले जात आहे, ज्यामुळे विविध वाहतूक सेवांचे एकत्रीकरण होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कॅार्पोरेटसाठी देखील प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×