Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

‘कॉफी विथ सीईओ’ उपक्रम, शिक्षकांचा सन्मान व संवाद

'कॉफी विथ सीईओ' उपक्रम, शिक्षकांचा सन्मान व संवाद

शिक्षकांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन दिले प्रोत्साहन 

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘कॉफी विथ सीईओ’ या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला. विशेष कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, योजना शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण तसेच ओपन लिंक्स फाउंडेशनचे संजय दालमिया व त्यांची टीम उपस्थित होती.

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ – सविस्तर बातमी 

उपक्रमाचा उद्देश उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रोत्साहन देणे, अध्यापनातील अडचणी जाणून घेणे तसेच त्यांच्या उपक्रमांची माहिती इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवून प्रेरणा देणे हा आहे. अनौपचारिक वातावरणात झालेल्या संवादात शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर, ऑनलाइन शिक्षण पद्धती, स्मार्ट क्लासरूम, ग्रामस्थ व लोकसहभागातून राबविण्यात येणारे उपक्रम, अध्यापनातील आव्हाने व आवश्यक भौतिक सुविधांबाबत अनुभव मांडले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शिक्षकांच्या सूचनांची नोंद घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ते म्हणाले, “शिक्षक हे समाज घडवणारे खरे शिल्पकार आहेत. ‘कॉफी विथ सीईओ’ हा उपक्रम शिक्षकांशी थेट संवाद साधण्याचे व्यासपीठ ठरले आहे. तुमच्यासारख्या उपक्रमशील शिक्षकांमुळेच पुणे जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेचे तुमच्या कल्पना व प्रयत्नांना नेहमीच पाठबळ राहील. यशस्वी संवादामुळे प्रशासन व शिक्षक यांच्यातील सहयोग अधिक दृढ होऊन शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नवा उत्साह निर्माण होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×