Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल -पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला

महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल -पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला

पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र पोलीस दल देशात अव्वल

marathinews24.com

पुणे – ‘ समर्पित भावनेने काम करणाऱ्या पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र पोलीस दल देशात अव्वल आहे’, असे मत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल यांनी व्यक्त केले. २० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचा समारोप हडपसर-रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारात झाला. यावेळी शुक्ला बोलत होत्या.

दौंडमध्ये सेवा पंधरवड्यात ५०० हून लाभपत्राचे वितरण – सविस्तर बातमी 

निवृत्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, पिंपरी -चिंचवडचे सहपोलीस आयुक्त शशिकांत महानवर, अणली पदार्थ विरोधी पथकाच्या शारदार राऊत, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते, डाॅ. बसवराज तेली, पल्लवी बर्गे, सौरभ अगरवाल, स्वप्ना गोरे यावेळी उपस्थित होते.

शुक्ला म्हणाल्या ‘ पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या माध्यमातून पोलिसांचे तपास कौशल्य वाढीस लागते. महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल आहे. पोलीस दलातील प्रत्येक कर्मचााऱ्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र पोलीस दल अव्वल आहे. पोलीस दलातील कर्मचारी समर्पित भावनेने काम करतात. पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी यापुढील काळात प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे.’ पोलीस निरीक्षक अर्चना कदम यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. राजेंद्र डहाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×