खराडी भागातील घटना
marathinews24.com
पुणे – भरधाव टँकरच्या धडकेत घरासमोर खेळणाऱ्या दीड वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. याप्रकरणी टंँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षा चालकाने चाकूच्या धाकाने ज्येष्ठाला लुटले – सविस्तर बातमी
आकांक्षा पुष्पेन साकेत (वय दीड) असे मृत्यु्मुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. आकांक्षाची आई रामकली पुष्पेन साकेत (वय २७, सध्या रा. चौधरी वस्ती, खराडी ) हिने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टँकर चालक कृष्णा विलास कंधारे (रा. पठारे वस्ती, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधारे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीुसार, साकेत दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. खराडी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पात ते मजूरी करतात . बांधकाम मजुरांच्या वसाहतीत ते राहायला आहेत. सोमवारी (६ ऑक्टोबर) साकेत दाम्पत्याची मुलगी आकांक्षा ही धरासमोर खेळत होती. त्यावेळी पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कोळपे तपास करत आहेत.



















