Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

पुरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठान धावले

पुरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठान धावले

मुख्यमंत्री सहायता निधीला दिली ५१ हजारांची मदतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे धनादेश सुपूर्द

marathinews24.com

पुणे – राज्यात मराठवाड्यासह सोलापूर, नांदेड अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने ५१ हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मदतींचा धनादेश करण्यात सुपूर्द करण्यात आला.

शिरूर तालुक्यातील पात्र मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने सोलापूर, मराठवाडा, नांदेड अशा अनेक भागात मोठी हानी झाली आहे. जीवित व वित्तहानी मुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरग्रस्ताना संघटनेच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशाने पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने ५१ हजार रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. यापूर्वी राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या कालावधीत पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली होती.

सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पुणे पत्रकार प्रतिष्ठानने केलेल्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी डुडी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, खजिनदार सुनीत भावे, विश्वस्त राजेंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार उमेश शेळके, मुस्तफा अत्तार, गजानन शुक्ला उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×