Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या, अल्पवयीन ताब्यात

चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या, अल्पवयीन ताब्यात

३० मोबाईल, रिक्षा जप्त; वानवडी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – प्रवाशांना रात्रीच्यावेळी निर्जनस्थळी नेऊन चाकूच्या धाकाने लुटमार करणाऱ्या रिक्षा चालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून तब्बल ३० मोबाईल, रिक्षा, चाकू असा तब्बल ३ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. टोळीने केलेले तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. फैजान मोहम्मद गौस शेख (रा. उरुळी देवाची) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

दगडाने ठेचून मित्राचा खून करणाऱ्या सराईतांना अटक – सविस्तर बातमी 

प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमारीच्या घटना वाढल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांकडून हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल गायकवाड आणि अमोल पिलाणे यांना हडपसर परिसरात एका रस्त्यावर रिक्षात बसलेले तिघेजण मोबाईल विक्रीसाठी बिहारी कामगारांना विचारणा करत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे असलेला मोबाईल चोरीचा असल्याचा संशय पथकाला आला. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पथकाने रिक्षा चालक आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी प्रवाशाला लुटून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. हडपसरमधील नवीन म्हाडा कॉलनीजवळील वॉशिंग सेंटर परिसरात संशयित रिक्षा (एमएच १२ व्हीबी ९४२०) चालक फैजान मोहम्मद गौस शेख (रा. उरुळी देवाची) आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.

तपासादरम्यान टोळीने प्रवाशांना पुणे स्टेशनहून शिवाजीनगरला सोडण्याचे सांगून रिक्षात बसवले. मात्र, त्यांना टर्फ क्लब रेसकोर्स परिसरात नेऊन चाकूचा धाक दाखवून मोबाईल, रोकड लुटून नेली. त्यांच्याकडून मोबाईल, चाकू, गुन्ह्यातील रिक्षा जप्त केली. आणखी चौकशीत टोळीने ठिकठिकाणी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल २९ मोबाईल बॅगेतून जप्त केले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे , सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे सुजाता फुलसुंदर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×