Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

धक्का लागल्यावरून तरूणाला बेदम मारहाण, तिघे अटकेत

डेक्कन नदीपात्रातील हॉटेलमध्ये राडा

marathinews24.com

पुणे – न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत पोलिसांनाही न जुमानता रात्रभर डेक्कन नदीपात्रात हॉटेल व्यावसायिकांमुळे आता थेट वादावादीचे प्रकार घडत आहेत. मध्यरात्री दोन वाजता जेवण करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा एकाला धक्का लागला. त्यामुळे झालेल्या बाचाबाचीतून तिघाजणांनी तरूणाच्या डोक्यात खुर्च्या मारून बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे रात्रभर सुरू असलेल्या हॉटेलमुळे रात्रपाळीला असलेले बीट मार्शल, स्थानिक वसुलीबाज अमलदारांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुख्यात गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

गणेश सतीश रणखांब (वय ३५), गणेश राजेंद्र कोंढाळकर (वय २७) आणि चिन्मय प्रवीण पुरूळेकर (वय ३५ सर्व रा. साईनाथ वसाहत, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हल्ल्यात ओमकार गरदास (वय २९ रा. गंजपेठ) हा जखमी झाला असून, त्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार ओमकार हा १२ ऑक्टोबरला मध्यरात्री दोनच्या सुमारास डेक्कन नदीपात्रातील हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. त्यावेळी तेथील एकाला ओमकारचा धक्का लागला. त्याच रागातून त्यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे तिघांनी मिळून सदगुरू हॉटेलमधील खुर्च्यां घेउन तक्रारदाराच्या डोक्यात मारल्या. त्याला हाताने मारहाण करून धमकी देउन जबर मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

नदीपात्रातील हॉटेलवाल्यांना पोलिसांचा आशीर्वाद

रात्री दोन वाजेनंतरही बिनधिक्कपणे डेक्कन नदीपात्रातील हॉटेल व्यवसाय तेजीत सुरू असतो. दरदिवशी नावाला स्थानिक पोलिसांकडून पेट्रोलिंग केल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांकडून बाहेरील लाईट बंद केली जाते. मात्र, त्यानंतर लगेचच अवघ्या काही मिनीटात पुन्हा हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ बनवून ग्राहकांना दिले जातात. पहाटे चार वाजेपर्यंत अनेकांचा राबता डेक्कन नदीपात्रात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकदा त्याठिकाणी गुन्हेगारांसह सराईतांची ये-जा असल्याचे वेळोवेळी पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधिताविरूद्ध पोलीस कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×